10 ते 12 वर्षांच्या पोरांचा रुळावर शिडी टाकून जीवघेणा खेळ

मात्र तिसऱ्यांदा या हुल्लडबाजांनी शिडी रुळावर व्यवस्थित ठेवली आणि अपघाताला निमंत्रण दिलं.

10 ते 12 वर्षांच्या पोरांचा रुळावर शिडी टाकून जीवघेणा खेळ

नवी मुंबई : नवी मुंबईत मोटरमनच्या प्रसंगावधानानं मोठा जीवघेणा अपघात टळला. घणसोली-कोपरखैराणेदरम्यान काल (शुक्रवारी) रेल्वे रुळावर शिडी आढळल्याने मोटरमनने लोकल वेळीच थांबवली.

विशेष म्हणजे 10 ते 12 वर्ष वयोगटातील तीन मुलांनी ही हुल्लडबाजी केली आहे. या मुलांनी 17 फूट लांबीची अॅल्युमिनिअमची शिडी तीन वेळा रुळावर ठेवली, रेल्वे जाऊन शिडीचे तुकडे व्हावेत, यासाठी हा पोरखेळ केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

दोनदा शिडी रुळावर व्यवस्थित न ठेवल्याने काहीही परिणाम झाला नाही. मात्र तिसऱ्यांदा या हुल्लडबाजांनी शिडी रुळावर व्यवस्थित ठेवली आणि अपघाताला निमंत्रण दिलं. पण दैव बलवत्तर म्हणून तिसऱ्या लोकलच्या मोटरमनच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने वेळीच रेल्वेला ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला.

मुलांच्या या बदमाशीमुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV