नवी मुंबई APMC मध्ये भाज्यांना अवघा 7-10 किलोचा दर!

गेल्या काही महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती वाढलेल्या होत्या. मात्र आता यामध्ये घट झाली आहे.

नवी मुंबई APMC मध्ये भाज्यांना अवघा 7-10 किलोचा दर!

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून 650 ते 700 गाड्या भाजीपाल्याची आवक होत असल्याने दर उतरले आहेत.

गेल्या काही महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती वाढलेल्या होत्या. मात्र आता यामध्ये घट झाली आहे.

सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यात आज नवी मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये आवक  वाढल्याने भाजीपाला शिल्लक राहत आहे.

10 ते 15 रुपये किलो घाऊक बाजारात विकला जाणारा भाजीपाला 7 ते 10 रुपये किलोवर आला आहे. मात्र असं असलं तरी सर्वसामान्यांसाठी भाजीपाला महागच आहे.

भाजीपाला दर भाजी प्रति किलो
कोबी 7 रुपये
टोमॅटो 6 रुपये
फ्लॉवर 9 रुपये
गाजर 13 रुपये
काकडी 12 रुपये
वांगी 10 रुपये
तोंडली 13 रुपये
भोपळा 8 रुपये
ढोबळी मिरची 17 रुपये
भेंडी 25 रुपये
पालक 6 रुपये जुडी
मेथी 10 रुपये जुडी
कोथींबीर 10 रुपये जुडी

 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Navi Mumbai : Vegetable prices fall due to increase in supply in APMC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV