राज ठाकरेंचं नवं कार्टून, भला मोठा कुत्रा अमित शाहांच्या मागे!

या व्यंगचित्रात भाजप अध्यक्ष अमित शाहा हे सर्वोच्च न्यायालयापासून धावत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

By: | Last Updated: 31 Jan 2018 08:30 AM
राज ठाकरेंचं नवं कार्टून, भला मोठा कुत्रा अमित शाहांच्या मागे!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या व्यंगचित्रातून न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणावर भाष्य केलं आहे. या व्यंगचित्रात भाजप अध्यक्ष अमित शाहा हे सर्वोच्च न्यायालयापासून धावत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

एक भलामोठा कुत्रा ज्याला सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली शंका असं संबोधून, तो कुत्रा अमित शाहांच्या मागे लागला आहे, असं राज ठाकरेंनी व्यंगचित्रात रेखाटलं आहे.  त्याच्या बाजूला न्यायमूर्ती लोया यांची कबर दाखवली आहे. त्यावर गाडले गेलेले ज. लोया प्रकरण असं लिहून, राज ठाकरे यांनी या कार्टूनला कबरची खबर असं म्हटलं आहे.

new cartoon by Raj Thackeray

राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रासोबत एक पोस्टही लिहिली आहे. ती पोस्ट जशीच्या तशी-

“मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या, त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता.

सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.

९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' किंवा २३ जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र तुम्ही पाहिलं असेलच.
पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत. त्यातलेच काही माझे 'फटकारे'. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो”.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: new cartoon by raj Thackeray on Amit Shah
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV