वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात

वाशी खाडीपुलाचं काम आजपासून सुरु होत आहे. त्यामुळं या पुलाची दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात

नवी मुंबई : वाशी खाडीपुलाचं काम आजपासून सुरु होत आहे. त्यामुळं या पुलाची दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. पुढील 20 दिवस हे काम सुरु राहणार असून, या कामासाठी 40 कुशल कामगार चेन्नईवरुन मुंबईत दाखल झाले आहेत.

नव्या वाशी खाडी पुलावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक असल्याने लोखंडी जॉईंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलावरील जाईंडर दुरूस्तीचं 23 जानेवारीपासून हाती घेण्यात येणार होतं. पण काही कारणास्तव हे काम पुढे ढकलण्यात आलं.

आजपासून या कामास सुरुवात होत असून, या कामासाठी मुंबईकडे येणारी मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, पुलाची उत्तर मार्गिका सुरु राहणार असून यावरुन मुंबईच्या दिशेनं वाहतूक होईल.

दरम्यान, मुंबईतून बाहेर पडणाऱ्या हलक्या वाहनांसाठी जुना खाडी पुल खुला करण्यात आला आहे. अवजड वाहनांना या पुलावरुन बंदी असल्यानं अवजड वाहतूक ऐरोलीमार्गे नवी मुंबईत वळवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

नव्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम पुढे ढकललं

नव्या वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: new vashi creek bridge repairing-work-start
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV