कल्याणमध्ये बँकेबाहेरुन नऊ लाखांची लूट, चोरट्यांचा शोध सुरु  

कल्याणजवळच्या कोनगावमध्ये बँकेत पैसे घेऊन निघालेल्या तरुणाकडचे 9 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

कल्याणमध्ये बँकेबाहेरुन नऊ लाखांची लूट, चोरट्यांचा शोध सुरु  

कल्याण : कल्याणजवळच्या कोनगावमध्ये बँकेत पैसे घेऊन निघालेल्या तरुणाकडचे 9 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. अर्षद अन्सारी ऑफिसचे 10 लाख रुपये घेऊन खडकपाडा भागातील अॅक्सिस बँकेत आला होता. यावेळीच दोघांनी त्याच्या हातातील पैशांची पिशवी पळवली.

बँकेत 1 लाख भरुन इतर पैसे घेऊन अर्षद पुन्हा ऑफिसकडे निघाला होता. मात्र, बँकेबाहेर पडताच त्यांची गाडी पंक्चर असल्याचं एका व्यक्तीनं अन्सारीला सांगितलं.

यावेळी गाडी पाहण्यासाठी अर्षद खाली वाकला. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातली ९ लाख रुपयांची पिशवी खेचून पोबारा केला. या प्रकाराने परिसरात एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, ही घटना घडली त्या ठिकाणापसून खडकपाडा पोलीस स्टेशन अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे आता चोरट्यांना बेड्या ठोकण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nine lakhs of robbery left out of Bank in kalyan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV