नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा

आमदार नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला.

नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा

मुंबई : मालाडमधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आता मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं आहे.

"एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.", असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

Rane

यावेळी आमदार नितेश राणे यांनी मुंबई काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखं वाटतंय आणि त्यांना मराठी माणसांची मतंही हवी असतात."

काय आहे प्रकरण?

मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी बोरीवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेणार आहेत. काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

संबंधित बातम्या  :

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nitesh Rane supports MNS workers latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: MNS nitesh rane नितेश राणे मनसे
First Published:
LiveTV