'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता

By: | Last Updated: > Monday, 18 April 2016 10:45 AM
No connection between centran-state government and Aapla Ghar : Prakash Mehta

मुंबई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘आपलं घर’ या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. तसंच 5 लाखांत पुण्याजवळ वन बीएचके घर देण्याचा दावा करणाऱ्या विकासकाला मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे मेहतांनी सांगितलं.

 

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो वापरुन जाहिरात सुरु असलेल्या या योजनेत दोष आढळल्यास दोन दिवसात कारवाई करण्यात येणार आहे.

 

पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

किरीट सोमय्यांचा योजनेवर सवाल

मंत्र्यांच्या फोटोसह ‘आपलं घर’ या योजनेची जोरदार जाहिरात सुरु झाल्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

 

फोटो : काय आहे पुण्यातील ‘5 लाखात आपलं घर’ योजना?

 

काय आहे आपलं घर योजना?

 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.

 

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.

 

जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:No connection between centran-state government and Aapla Ghar : Prakash Mehta
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मांढरदेवी गडावर कुटुंबातील सहा जणांचं विषप्राशन, तरुणाचा मृत्यू
मांढरदेवी गडावर कुटुंबातील सहा जणांचं विषप्राशन, तरुणाचा मृत्यू

सातारा : साताऱ्यातील मांढरदेवी गडावर एकाच कुटुंबातील सहा जणांनी

बीडमध्ये रस्त्याशेजारी सापडलेल्या नवजात अर्भकाचा अखेर मृत्यू
बीडमध्ये रस्त्याशेजारी सापडलेल्या नवजात अर्भकाचा अखेर मृत्यू

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी शिवारातील कनसेवाडी

राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?
राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?

पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर, त्याचे हादरे

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/07/2017

मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, आरोपी सुनील

चंद्रपुरातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या जाळ्यात
चंद्रपुरातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर : ‘बंटी-बबली’ फिल्म स्टाईल चोऱ्या करणारं एक जोडपं चंद्रपूर

बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

दिल्ली : महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या

अंबरनाथमध्ये लूटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार
अंबरनाथमध्ये लूटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार

कल्याण : अंबरनाथमध्ये लुटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार

टॉयलेट एक 'दंड' कथा
टॉयलेट एक 'दंड' कथा

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या 53 जणांना अटक

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!
मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

नागपूर: मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते

संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज
संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज

औरंगाबाद: कोपर्डी बलात्कार पीडितेच्या स्मारकावरुन संभाजी