नीरव मोदी, मेहूल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नीरव आणि मेहूलने केलेल्या घोटाळ्यात भारतीय पैशांच्या अपहार झाला आहे. त्यामुळे या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांचा माग काढण्यासाठी नीरवची चौकशी करणं अतिशय आवश्यक असल्याचं ईडीने म्हटलं.

नीरव मोदी, मेहूल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्याविरोधात विशेष पीएमएलए कोर्टाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी करणारा अर्ज अंमलबजावणी संचालनालयाने विशेष पीएमएलए कोर्टात सादर केला होता. तीन वेळा समन्स बजावूनही नीरव मोदी आणि मेहूल चौकशीला हजर राहिले नाहीत आणि चौकशीत कोणतंही सहकार्य न केल्याचा ईडीने कोर्टात आरोप केला होता.

तसंच नीरवने आतापर्यंत दोन वेळा ई-मेलवर प्रश्न विचारा असं म्हटलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तसं शक्य नसल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं होतं.

नीरव आणि मेहूलने केलेल्या घोटाळ्यात भारतीय पैशांच्या अपहार झाला आहे. त्यामुळे या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांचा माग काढण्यासाठी नीरवची चौकशी करणं अतिशय आवश्यक असल्याचं ईडीने म्हटलं. त्यासोबतच letter of undertaking देण्याच्या प्रक्रियेत नीरवने हस्तक्षेप केला आहे, असाही  आरोप ईडीने ठेवला होता.

संबंधित बातम्या

CBI आणि ED नीरव मोदी-मेहुल चोक्सीकडून पैसा कसा वसूल करणार?


नीरव मोदी फरार नाही, कामासाठी अगोदरपासूनच परदेशात : वकील


नीरव मोदी प्रकरणामुळे जेटलींवर मोदी नाराज : पृथ्वीराज चव्हाण


पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी


PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द


PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Non bailable warrant issued against Nirav Modi and Mehul Choksi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV