'लवकरच मुंबईत आमचा महापौर', सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

‘उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आता तरी कमी होणार का?’ असं म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

Now ours mayor in Mumbai kirit Sommya challenge to Shivsena latest

मुंबई : मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

 

‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे.

 

शिवसेनेवर टीका करतानाच सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आता तरी कमी होणार का?’ असं म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

 

मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मात्र, भांडुप पोटनिवडणुकीतील पराभवनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.

 

‘कंत्राट माफियावरुन एवढे आरोप झाले तरी, ‘हम नहीं सुधरेंगे’ अशी शिवसेनेची प्रवृत्ती आहे.  त्यामुळेच हा पराभव झाला आहे.’ अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.

 

दरम्यान, महापौरपदासाठी काही नवी रणनीती आखणार का? याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘पिछली बार तो उनको छोड दिया था… आता लवकरच संख्याबळ त्यांच्या पुढे नेणार आणि त्यानंतर आमचा महापौर बसवणार.’

 

भांडुपमधील पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपनं बरीच प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीती विजयानं पालिकेतील संख्येचं समीकरण सध्या बदललं आहे. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या बराच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या पराभवरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर आता सोमय्या यांनीही निशाणा साधला आहे.

 

संबंधित बातम्या :

 

मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Now ours mayor in Mumbai kirit Sommya challenge to Shivsena latest
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा : हायकोर्ट
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, तात्काळ कामावर रुजू व्हा :...

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे. संपावर गेलेल्या एसटी

एसटी संपावरुन मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
एसटी संपावरुन मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरु असल्याने मुंबई

दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार
दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल...

मुंबई : कॅन्सर या दुर्धर रोगावर गरिबातल्या गरिबाला इलाज करता यावा

हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स
हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स

मुंबई: उल्हासनगरात एक अनोखा सत्संग सुरु आहे. ध्वनी प्रदूषण

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजार  घसरला, सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट
लक्ष्मीपूजनादिवशी शेअर बाजार  घसरला, सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट

मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज कमालीची घसरण पाहायाला मिळाली.

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!
लक्ष्मीपूजनाला राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, मोदी-शाहांवर निशाणा!

मुंबई : फेसबुक पेज सुरु केल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी

प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक
प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक

मुंबई: संप मिटविण्याऐवजी एसटी प्रशासन संप चिघळवत आहे, असा गंभीर

महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!
महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर