संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या संख्येत वाढ

राष्ट्रीय उद्यानात विविध ठिकाणी लावलेल्या 49 ट्रॅपिंग कॅमेरा आणि 235 फोटोजच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी बिबट्यांनी संख्या 41 असल्याचं आढळून आलं.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या संख्येत वाढ

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कॅमेरा ट्रॅपिंग टूलच्या माध्यमातून आणि संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध ठिकाणी लावलेल्या 49 ट्रॅपिंग कॅमेरा आणि 235 फोटोजच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी बिबट्यांनी संख्या 41 असल्याचं आढळून आलं.

2011 साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची संख्या २१ होती. तर २०१५ साली ही संख्या ३५ इतकी नोंद करण्यात आली. पण आता त्यात वाढ झाली असून, आता ही संख्या ४१ वर गेली आहे.

दरम्यान, बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळे ही संख्या जास्तही असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: lepard
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV