'कर्जमाफी' अधिकाऱ्यांच्या जीवावर, एकाचा मृत्यू, तर दुसरा आयसीयूत

सरकारनं घाई-घाईनं कर्जमाफी योजना जाहीर केली. त्याच्या अंमलबजावणीत अऩेक त्रुटीत आहेत. मात्र या सगळ्याचा मनस्ताप अधिकाऱ्यांना होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या तक्रारीवर सरकार काय उपाय करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

'कर्जमाफी' अधिकाऱ्यांच्या जीवावर, एकाचा मृत्यू, तर दुसरा आयसीयूत

मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमुळे अधिकारी तणावात असल्याचं समोर आलं आहे आणि यामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा आयसीयूमध्ये दाखल आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे.

त्यामुळे आता कर्जमाफीच्या योजनेसमोर सहकार विभागातील अधिकाऱ्यांना हात टेकले आहेत. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संघटनेनं पुण्यात बैठक बोलावली आहे.

सहकार विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने 3 नोव्हेंबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत क्षेत्रीय कार्यलयांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि त्याचसोबत अधिकाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न यावर चर्चा होणार आहे.

सरकारनं घाई-घाईनं कर्जमाफी योजना जाहीर केली. त्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटीत आहेत. मात्र या सगळ्याचा मनस्ताप अधिकाऱ्यांना होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या तक्रारीवर सरकार काय उपाय करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर सहकार विभागाची राजपत्रित अधिकारी संघटना काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमीचा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: officers finding difficult to disburse money to farmers in maharashtra latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV