मुंबईनंतर गुजरातवरचंही संकट टळलं, ओखी वादळाचा जोर ओसरला

मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या ओखी वादळाचा धोका टळल्याचं समजतं आहे. मुंबईपासून साधारण 200 किलोमीटरवर असलेलं ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. पण या वादळाचा जोर ओसरल्यानं गुजरातवरचंही संकट टळलं आहे.

मुंबईनंतर गुजरातवरचंही संकट टळलं, ओखी वादळाचा जोर ओसरला

मुंबई : मुंबईच्या दिशेनं कूच करणाऱ्या ओखी वादळाचा धोका टळल्याचं समजतं आहे. मुंबईपासून साधारण 200 किलोमीटरवर असलेलं ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. पण या वादळाचा जोर ओसरल्यानं गुजरातवरचंही संकट टळलं आहे.

काल (मंगळवार) संध्याकाळी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार, ओखी चक्रीवादळ गुजरातमधल्या सूरतपासून 250 किलोमीटर अंतरावर होतं. ओखी वादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

ओखी वादळाचा सर्वात जास्त फटका दक्षिण गुजरातला बसणार आहे. दरम्यान, ओखी वादळामुळं मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्यात इतर ठिकाणी सुरु झालेला पाऊस देखील ओसरला आहे.

दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गप्रमाणेच गोव्याच्या किनारपट्टीवरही ओखी वादळाचा परिणाम काल पाहायला मिळाला. रत्नागिरीत काही ठिकाणी किनारपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये समुद्राचं पाणीही शिरलं होतं. सोमवार रात्रीपासून लाटांचं तांडव सुरु असल्यामुळं मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

मात्र, ओखीचा धोका टळल्याचं वृत्त समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान लाटांच्या तडाख्यानं रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Okhi goes down in Mumbai storm towards Gujarat latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV