फोटोशॉप केलेलं धार्मिक छायाचित्र फेसबुकवर, आरोपीला अटक

फोटोशॉप केलेलं धार्मिक छायाचित्र फेसबुकवर, आरोपीला अटक

मुंबई : फोटोशॉप केलेला धार्मिक फोटो फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. संतप्त नागरिकांनी पोलिस स्टेशनवर दगडफेक केल्याचीही माहिती आहे.

नवी मुंबई पालिकेत काम करणाऱ्या तरुणानं हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यानंतर चिता कँप परिसरात वातावरण तापलं. पोलिसांनी सायबर गुन्ह्याअंतर्गत आरोपीला अटकही केली. मात्र काही तासांनंतर 100 ते 150 जणांच्या टोळक्यानं ट्रॉम्बे पोलिस स्टेशनवर दगडफेक केली.

दगडफेकीनंतर पोलिसांच्या तीन गाड्याही जाळण्यात आल्या. या प्रकारात काही पोलिस जखमीही झाले आहेत. या प्रकारानंतर पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV