वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

वांद्रे-वरळी सी लिंकवर गेल्यानंतर लघुशंकेच्या निमित्ताने या व्यक्तीने टॅक्सी थांबवण्याची विनंती केली. टॅक्सी चालकाने थांबण्यास नकार दिला. मात्र आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याचं सांगितल्यानंतर टॅक्सी थांबवण्यात आली.

वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवर आणखी एक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने सी लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

या व्यक्तीने लीलावतीला जाण्यासाठी हाजीअली येथून टॅक्सी पकडली. वांद्रे-वरळी सी लिंकवर गेल्यानंतर लघुशंकेच्या निमित्ताने या व्यक्तीने टॅक्सी थांबवण्याची विनंती केली. टॅक्सी चालकाने थांबण्यास नकार दिला. मात्र आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याचं सांगितल्यानंतर टॅक्सी थांबवण्यात आली.

टॅक्सी थांबताच त्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि समुद्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन विभागाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. टॅक्सी चालकाच्या मदतीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV