ठाणे: मुंब्र्यातील तरुण आयसिसमध्ये सामील

By: | Last Updated: > Friday, 9 December 2016 7:50 AM
One more youth from Thane 28 yr old Tabrez Tambe joins ISIS

ठाणे : ठाण्यातील आणखी एक तरुण आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. 28 वर्षीय तबरेज नूर मोहम्मद तांबे हा मूळचा मुंब्र्याचा आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे.

 

तबरेज 2015 च्या सुरुवातीला कामाच्या निमित्ताने इजिप्तला गेला होता. तिथून तो लीबियाला पोहोचला. त्यानंतर तबरेज आयसिसमध्ये सामील झाला. आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती खुद्द तबरेजने कुटुंबीयांना दिली.

 

“लीबियाला जाण्यासाठी तबरेज सौदी अरेबियातील अली नावाच्या एका मित्रासोबत आधी इजिप्तला गेला. आता ते दोघेही आयसिसमध्ये सामील झाले आहेत,” असं तबरेजचा भाऊ सौद नूर मोहम्मद तांबेने सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, “आयएसआयएमध्ये सामील होण्यासाठी अलीने तबरेजचं ब्रेनवॉश केलं. रियाधमध्ये काम करत असताना तबरेज अलीच्या संपर्कात आला होता.”

 

2015 मध्ये तबरेज सौदी अरेबियातील रियाधमधून काम करुन परतला. त्यानंतर तो इजिप्तला जाण्यासाठी घरातून निघाला. कामाच्या निमित्ताने तबरेज निघाला असावा, असं कुटुंबीयांना वाटलं. पण काही महिन्यांपूर्वी स्वत: तबरेजने कुटुंबीयांना कॉल करुन, आपण लीबियात पोहोचलो असून आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती दिली.

 

याप्रकरणी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 16,18 18 (ब), 20, 38 आणि 39 गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु आहे.

Marathi Big Boss News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:One more youth from Thane 28 yr old Tabrez Tambe joins ISIS
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

इतिहासाची पानं चाळण्यापेक्षा संधीचं सोनं करा, आठवलेंच्या आरोपांना विखे पाटलांचे उत्तर
इतिहासाची पानं चाळण्यापेक्षा संधीचं सोनं करा, आठवलेंच्या आरोपांना...

 शिर्डी: रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल माझा कट्ट्यावर

आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान
आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान

अमरावती : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांना प्रोत्साहन

LIVE : पंतप्रधानांची दुष्काळ आढावा बैठक 7 मे रोजी, मुख्यमंत्री उपस्थित राहणार
LIVE : पंतप्रधानांची दुष्काळ आढावा बैठक 7 मे रोजी, मुख्यमंत्री उपस्थित...

हेडलाईन्स   पंतप्रधानांची दुष्काळ आढावा बैठक 7 मे रोजी,