विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक अविश्वासाचा ठराव आणणार!

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक अविश्वासाचा ठराव आणणार!

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा अध्यक्ष सदन चालवताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी आज विरोधकांनी मंत्रालयात पत्रकार परिषदही घेतली.

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणणार : विखे-पाटील

‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’ असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

विरोधी पक्षाने आज हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वासाचा प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे आता यापुढे विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Opposition to bring resolution of unbelief against Vidhan Sabha Speaker latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV