'त्या' ६ नगरसेवकांच्या बाबतीत दिलेला आदेश बेकायदेशीर : मनसे

मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करुन शिवसेनेत दाखल झालेल्या 'त्या' सहा नगरसेवकांच्याबाबतीत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

'त्या' ६ नगरसेवकांच्या बाबतीत दिलेला आदेश बेकायदेशीर : मनसे

मुंबई : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करुन शिवसेनेत दाखल झालेल्या 'त्या' सहा नगरसेवकांच्याबाबतीत कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेत दाखल होण्याच्या या प्रक्रियेला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली होती.  मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांच्यावतीनं ही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी सादर करण्यात आली. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या सर्वांसह शिवसेना गटनेते यशवंत जाधव व कोकण विभागीय आयुक्तांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. सेनेला चार अपक्षांचा पाठिंबा असून भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचे संख्याबळ एकने वाढले, भाजप डोईजड होऊ शकेल त्यामुळे शिवसेने शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ तब्बल ९४ वर पोहोचले आहे.

संबंधित बातम्या :

तेव्हा तिजोरी उघडलेली, आता चोरी कशाला? : संदीप देशपांडे


मनसेच्या मुंबईतील 6 नगरसेवकांचा सेनाप्रवेश अधिकृत : सूत्र


'बहू भी कभी सास बनती है’, हे लक्षात ठेवा : बाळा नांदगावकर


कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले


‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: order issued against 6 corporaters is illegal MNS filed petition in High Court latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV