डोंबिवलीत पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा

संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागली आहे. डोंबिवलीच्या भागशाळा मैदान परिसरात पतंगबाजी रंगात आली असताना त्या पतंगाच्या मांजात एक घुबड अडकलं आणि गंभीर जखमी झालं आहे.

डोंबिवलीत पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा

मुंबई : संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागली आहे.  डोंबिवलीच्या भागशाळा मैदान परिसरात पतंगबाजी रंगात आली असताना त्या पतंगाच्या मांजात एक घुबड अडकलं आणि गंभीर जखमी झालं आहे.

पतंगाच्या मांजामुळे घुबड गंभीर जखमी झालं असून त्याच्या पायाला जबर इजा झाली. त्यामुळे त्याला आता आयुष्यभर उडता येणार नाही. पक्षी आणि प्राणीप्रेमी निलेश भणगे यांना घुबडाची माहिती मिळताच त्यांनी त्याला घरी आणून उपचार केले. उपचारानंतर जखम बरी होणार असली तरी घुबड मात्र आता आकाशात उडण्यास असक्षम झालं आहे.

दरम्यान पिंपरीतही गेल्या आठवड्याभरात पतंगाच्या मांजामुळे तीन वर्षांचा चिमुकला हमजा खान आणि ज्येष्ठ नागरिक रंगनाथ भुजबळ, या दोघांचे प्राण थोडक्यात बचावले. मांजामुळे हमजाचा डोळा कापला गेला होता. त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली, तर रंगनाथ यांचा गळा आणि हाताचे बोट कापता-कापता बचावले. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीवरील रस्त्यावर दुचाकीवरून निघाले असताना ही घटना घडली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: owl got injured due to kite flying latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV