मुंबई-अहमदाबाद हायवेवर कंटेनर-टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू

अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई-अहमदाबाद हायवेवर कंटेनर-टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये कंटेनर आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की टेम्पोचा चक्काचूर झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचपाडा भागात हा अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवर धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती, ही टेम्पोचा पार चेंदामेंदा झाला.

अपघातात दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. अपघातानंतर कंटेनरमधील सामानही रस्त्यावर विखुरलं.

Palghar Accident 2

अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे अंदाजे 5 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सध्या वाहतूकीची कोंडी पूर्ववत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Palghar : Accident on Mumbai Ahmedabad National Highway kills two latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV