‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल

मुलाला जिवंत पाहायचे असल्यास 50 लाख रुपये देण्याची आणि त्याचसोबत यासंदर्भात कुणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.

‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल

पालघर : मित्रांची संगत, किंमती मोबाईल, फिरण्याची हौस या साऱ्यांमुळे तलासरीमधील एका मुलाने चक्क स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि वडिलांकडे मित्राकरवी 50 लाखांची मागणी केली. या बोगस अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश तलासरी पोलिसांनी केला आहे.

तलासरीमधील कापड व्यापारी दिनेश प्रजापती यांना 22 तारखेच्या रात्री फोन आला. त्यांचा 17 वर्षीय मुलगा दिनेश याचं अंधेरीतून अपहरण केल्याचं समोरुन सांगण्यात आलं आणि मुलगा जिवंत हवा असल्यास 50 लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.

दिनेश प्रजापती यांनी सर्व प्रकार तलासरी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभिर्य ओळखलं आणि तातडीने तीन टीम तयार केल्या. दिनेश प्रजापती यांच्या मदतीने मुलाला सोडवण्यासाठी एक प्लॅन आखण्यात आला.

मुलाला जिवंत पाहायचे असल्यास 50 लाख रुपये देण्याची आणि त्याचसोबत यासंदर्भात कुणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.

स्थानिक अन्वेषण शाखा पालघर आणि तलासरी पोलिसांच्या तिन्ही टीमने वडिलांना येणाऱ्या फोनप्रमाणे करण्यास सांगत, रिकामी बॅग घेण्यास सांगितली आणि अपहरणकर्त्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बोईसर, त्यांनतर चिल्लरफाटा, सिमला हॉटेल, मनोरपर्यंत दिनेश प्रजापती यांच्या गाडीचा माग घेत पोलिसांनी सापळा लावला. मात्र अपहरणकर्ता फोनवर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी जागा बदलत होता आणि अखेर त्याने मनोर येथे पैसे ठेवण्यास सांगितले.

त्याप्रमाणे रिकामी बॅग पेट्रोलपंप शेजारील निर्जनस्थळी ठेवली आणि पोलिसांनी त्याला पैशाची बॅग घेण्यासाठी येण्याची संधी दिली. अपहरणकर्ता आला खरा, मात्र रिकामी बॅग पाहून त्याने पुन्हा जवळच असलेल्या लक्ष्मी लॉजकडे निघून गेल्याने पोलिसांनी लॉजला बाहेरून घेराव घालत, एका रुममधून अपहरण झालेला भूमिका प्रजापती आणि अपहरणकर्ता असीम इकबाल शेख याला ताब्यात घेत सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिसांना पाहताच अपहरणकर्ता असीम शेख भूमिक प्रजापतीनेच अपहरणाचा कट रचला असून त्याच्या सांगण्यावरुनच 50 लाखांची मागणी करणारा फोन केल्याचं कबूल केलं आणि अपहरणाचा बनाव उघड झाला.

भूमिक प्रजापती हा उंबरगाव येथे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. मात्र शिकवणीसाठी काही महिन्यांपूर्वीच त्याला अंधेरी येथील नातेवाईकांकडे पाठविण्यात आले होते. मौजमजा, किंमती मोबाईल इत्यादीसाठी तलासरीमधील मित्र असीम शेख याच्या मदतीने अपहरणाचा बनाव करण्याचा कट स्वतःच भूमिकने रचला असल्याचं समोर आलं.

22 सप्टेंबर रोजी अंधेरी येथे अपहरणाचा गुन्हा 531/17 , 363 प्रामाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यप्रामाणे दोघांना अंधेरी साकिनाका पोलिसांच्या तांब्यात देण्यात आलं असून अधिक तपास अंधेरी पोलिस करीत आहेत .

या अपहरणनाट्यात असीम शेख याच्यासह आणखी काही मित्र सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV