पालघरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सांगाडाही सापडला

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर दांडा पाडातल्या किराणा स्टोअरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

पालघरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सांगाडाही सापडला

पालघर : मुंबईलगतच्या बोईसरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर घटनास्थळी तपास करताना मानवी सांगाडा मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर दांडा पाडातल्या किराणा स्टोअरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच महिलांसह एका युवकाला अटक केली होती.

तपासादरम्यान घटनास्थळी एक मृतदेह पुरला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खोदकाम सुरु केलं आणि शौचालयाच्या चेंबरमध्ये त्यांच्या हाती मानवी सांगाडा लागला.

हा सांगडा कुणाचा आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. आणखीही काही सांगाडे इथे पुरले आहेत का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Palghar : Sex racket busted, Human skeleton found latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV