सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

रेस्टॉरंटच्या मालकाने सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिला. त्यानंतर जयजीत सिंह याविरोधात ग्राहक कोर्टात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदवत नुकसान भरपाईची मागणी गेली.

सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या रेस्टॉरंटला सर्व्हिस चार्ज आकारणं चांगलंच महाग पडलं आहे. 181 रुपये 5 पैशाच्या सर्व्हिस चार्जपायी आता रेस्टॉरंटला दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

आयपीएस अधिकारी जयजीत सिंह 12 ऑगस्टला या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं जेवणाचं बिल 1810 रुपये झालं. त्यावर दहा टक्क्यांचा सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. यावरुन जयजीत यांनी रेस्टॉरंटच्या मालकाशी वाद घातला आणि सर्व्हिस चार्ज भरणार नसल्यात सांगितलं.

मात्र, रेस्टॉरंटच्या मालकाने सर्व्हिस चार्ज काढण्यास नकार दिला. त्यानंतर जयजीत सिंह याविरोधात ग्राहक कोर्टात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदवत नुकसान भरपाईची मागणी गेली. ग्राहक न्यायालयात जेव्हा हे प्रकरण उभं राहिलं तेव्हा रेस्टॉरंट मालक नोटीस बजावूनही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कोर्टाने जयजीत सिंह यांच्या बाजूने निकाल देत जयजीत यांनी 10 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

ही नुकसान भरपाईची मिळालेली रक्कम जयजीत यांनी मुख्यमंत्री कल्याण निधीला देणाचा निर्णय घेतला आहे. नवीन कायद्यानुसार सर्व्हिस चार्ज देणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.

सर्व्हिस चार्ज म्हणजे काय?

हॉटेल तुम्हाला जी सेवा देतात, त्याच्या मोबदल्यात सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो. सर्व्हिस चार्जची टीप म्हणून वसुली केली जाते. यासाठी कोणताही नियम किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत. हा सर्व्हिस चार्ज 4 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. काही रेस्टॉरंट असं समजतात की, त्यांच्या इथे टीप देणं आवश्यक आहे. त्यामुळे ते हा चार्ज वसूल करतात. मात्र सरकारच्या तिजोरीत फक्त जीएसटी जमा होतो.

संबंधित बातम्या

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये टीप देऊ नका, कारण…

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: penalty of Rs 10000 to restaurant who charging to service charge latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV