देशातलं सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, 80 रुपयांचा टप्पा ओलांडला

पेट्रोल 80 रुपयांच्या वर जाण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे.

देशातलं सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, 80 रुपयांचा टप्पा ओलांडला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलने 80 रुपये प्रती लिटरचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील पेट्रोलचे आजचे दर 80.10 रुपये प्रती लिटर आहेत. पेट्रोल 80 रुपयांच्या वर जाण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. शिवाय या वर्षातली ही सर्वात मोठी वाढ आहे.

मुंबईत पेट्रोल 80 रुपये 10 पैसे प्रती लिटर, तर डिझेल 67 रुपये 10 पैसे प्रती लिटर आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असल्याने ही वाढ लक्षात येत नाही. मात्र गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

इतर शहरांची परिस्थती

  • राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 72 रुपये 23 पैसे प्रती लिटर, तर डिझेल 63 रुपये 01 पैसे प्रती लिटर आहे.

  • लखनौमध्ये पेट्रोल 73 रुपये 94 पैसे, तर डिझेल 63 रुपये 46 पैसे प्रती लिटर आहे.

  • बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल 76 रुपये 55 पैसे, तर डिझेल 66 रुपये 76 पैसे प्रती लिटर आहे.

  • मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोल 77 रुपये 23 पैसे, तर डिझेल 65 रुपये 89 पैसे प्रती लिटर आहे.

  • राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 75 रुपये 18 पैसे, तर डिझेल 67 रुपये 46 पैसे प्रती लिटर आहे.

  • चंदीगडमध्ये पेट्रोल 69 रुपये 47 पैसे, तर डिझेल 61 रुपये 17 पैसे प्रती लिटर आहे.

  • अहमदाबादमध्ये पेट्रोल 71 रुपये 83 पैसे, तर डिझेल 67 रुपये 83 पैसे प्रती लिटर आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: petrol price hit 80 rupees rate first time ever
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV