देशातील पेट्रोल पंप चालकांचा संप अखेर मागे

13 ऑक्टोबरच्या संपात 54 हजार डिलर सहभागी होणार होते.

देशातील पेट्रोल पंप चालकांचा संप अखेर मागे

मुंबई : देशातील पेट्रोल पंप चालकांनी संप मागे घेतला आहे. येत्या 13 ऑक्टोबरला देशभरातील पेट्रोल पंप चालक संपावर जाणार होते.

पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी, तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष याविरोधात देशातील पेट्रोल पंपचालकांनी हा संप पुकारला होता. मात्र अखेर संप मागे घेण्यात आला आहे.

डीलर्सच्या मागण्या काय?

  • 4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार

  • मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज

  • कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन

  • रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान

  • राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्त आणि समान होतील


संबंधित बातम्या :

13 ऑक्टोबरला पेट्रोलपंप चालकांचा एकदिवसीय संप

गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल जवळपास 3 रुपयांनी स्वस्त!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: petrol pump strike पेट्रोल पंप संप
First Published:

Related Stories

LiveTV