रेल्वेमंत्र्यांचा सीएसएमटी ते माटुंगा लोकलने प्रवास

माटुंगा हे देशातील पहिलं असं स्थानक आहे, जिथे सर्व कामकाज महिला कर्मचारी पाहतात.

रेल्वेमंत्र्यांचा सीएसएमटी ते माटुंगा लोकलने प्रवास

मुंबई : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास केला. सीएसएमटी ते माटुंगा असा प्रवास करत त्यांनी माटुंगा स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. माटुंगा हे देशातील पहिलं असं स्थानक आहे, जिथे सर्व कामकाज महिला कर्मचारी पाहतात.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नेही घेतली आहे. या स्थानकातील 41 महिला कर्मचारीच सर्व कामकाज पाहतात. या महिला कर्मचाऱ्यांचं कौतुक करत पियुष गोयल यांनी आनंदही व्यक्त केला.

piyush goyal 2

जुलै 2014 मध्ये 34 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून घोषित करण्यात आलं. तिकीट बुकिंग, तिकिट तपासणी पथक, सुरक्षा कर्मचारी आणि उद्घोषणा विभागासह सर्व कामकाज महिलाच पाहतात.

VIDEO : घे भरारी : लेडीज स्पेशल माटुंगा स्थानकाची 'लिम्का बुक'मध्ये नोंद

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: piyush goyal travelled in a local train from CSTM to Matunga in Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV