मुंबईच्या दादर चौपाटीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य

गेल्या काही दिवसात मुंबईच्या दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चौपाटीची अवस्था दयनीय झालीय.

मुंबईच्या दादर चौपाटीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईच्या दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चौपाटीची अवस्था दयनीय झालीय.

वास्तविक, गणपती विसर्जनानंतर दादर चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य अजूनच वाढल्याच पाहायला मिळतंय.

प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास ,थरामोकोल हे समुद्रात, नाल्यात फेकले जातात आणि हाच कचरा समुद्र भरतीच्या वेळी बाहेर फेकला जात आहे. त्यामुळे मुंबईच्या दादर चौपाटीची अवस्था दयनीय झाली आहे.

सफाई कामगार त्याचसोबत वेगवेगळे ग्रुप जरी येथे सफाईच काम नित्यनियमाने करत असले, तरी दरदिवशी हा कचरा चौपाटीच अस्तित्व धोक्यात आणत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV