पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

विशेष या आरोपींमधील मनोज खरात हा अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. आरोपी मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता.

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून अटकसत्र सुरु झालं आहे. पंजाब नॅशलन बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती.

विशेष या आरोपींमधील मनोज खरात हा अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. आरोपी मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता.

घोटाळा कसा झाला?

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली आहे.

नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्याने सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.

लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं हमीपत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

संबंधित बातम्या :


PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द


नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त


PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती


PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?


PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले


पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल


पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PNB Scam : 3 accused sent to CBI custody
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV