अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

मुंबईतील अवैध फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे.

अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

मुंबई : मुंबईत फेरीवाल्यांवरुन मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता अवैध फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आहे. मुंबईसह उपनगरांमधल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

मात्र, अवैधपणे फुटपाथवर दुकानं थाटणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई कधी होणार?  हा प्रश्न अनुत्तरितच आहे. काल (रविवार) वाशी रेल्वे स्टेशन भागात तोडफोड करणारे ५ मनसे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

मनसेचं आंदोलन

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.

मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण

दरम्यान मनसेने मालाडमध्येही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात माळवदे यांना जबर जखम झाली.

मनसे नेते संदीप देशपांडेंना अटक आणि सुटका

मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

संजय निरुपम यांनी चिथावल्याचा आरोप

दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे फेरीवाल्यांनी मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. संजय निरुपम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केली.

संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. शनिवारी संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे.

संबंधित बातम्या :

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट 

… तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात


दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला 

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Police arrested MNS activists in hawkers case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV