विवाहित महिलेला अश्लिल मेसेज, आरोपीला बेदम चोप

पीडित महिलेने धाडस करुन आरोपीचे कारनामे उघडकीस आणले. तिच्या धाडसामुळेच आरोपीला धडा शिकवण्यास मदत झाली.

विवाहित महिलेला अश्लिल मेसेज, आरोपीला बेदम चोप

नालासोपारा (ठाणे) : विवाहित महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या आरोपीला महिलांनी चांगलाच चोप दिला. नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरात ही घटना घडली.

नालासोपारा पूर्व भागातील ओसवाल नगरातील लोटस इमारतीजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास छेडछाडीची घटना घडली. आरोपीने छेडछाड आज केली असली, तरी गेल्या आठ दिवसांपासून आरोपी महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज, अश्लिल फोटो, गाणी पाठवत होता.

पीडित महिलेने धाडस करुन आरोपीचे कारनामे उघडकीस आणले. तिच्या धाडसामुळेच आरोपीला धडा शिकवण्यास मदत झाली.

दरम्यान, महिलांनी आरोपीला बेदम चोप देत, तुळिंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Police arrested person who send vulgar message to women
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV