मुंबईतील गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला बेड्या

ऑक्टोबरमध्ये गरीबनगरमधील बेकायदेशीर झोपड्या तोडण्याचे काम सुरु असताना, 25 ऑक्टोबरला याच ठिकाणी आग लागली.

मुंबईतील गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला बेड्या

मुंबई : वांद्रे रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही नालासोपाऱ्यात लपून बसले होते. त्यांनी स्वत:ची ओळखही बदलली होती.

25 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर परिसरात आग लागून, शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.

सलीम सय्यद उर्फ सलीम लाईटवाला आणि त्याचा मुलगा सलमान अशा दोघांना निर्मल नगर पोलिसांनी नालासोपऱ्यातून अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसातील डीसीपी सचिन पाटील यांनी दिली.

ऑक्टोबरमध्ये गरीबनगरमधील बेकायदेशीर झोपड्या तोडण्याचे काम सुरु असताना, 25 ऑक्टोबरला याच ठिकाणी आग लागली. यात 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तपासात असे समोर आले की, ही आग लागली नसून, जाणीवपूर्वक लावण्यात आली होती. त्यामुळे मग गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि आरोपींचा शोध घेतला जात होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Police arrested two accused in Bandra slum fire case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV