पॉर्नमुळे संसाराची वाताहत, बंदी आणा, विवाहिता सुप्रीम कोर्टात

पॉर्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे भारतात सेक्सविषयक गुन्हे आणि वैवाहिक वादांमध्ये वाढ झाल्याचंही तरुणीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

पॉर्नमुळे संसाराची वाताहत, बंदी आणा, विवाहिता सुप्रीम कोर्टात

मुंबई : पॉर्नमुळे माझं वैवाहिक आयुष्य पूर्णपणे वाताहत केली आहे. त्यामुळे भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईतील 27 वर्षीय विवाहितेने सुप्रीम कोर्टात केली आहे.

'माझ्या 35 वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो. त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. सुप्रीम कोर्टाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी.' असं तरुणीने सुप्रीम कोर्टाला सांगितलं.

आपला पती फँटसीमध्ये रममाण झालेला असतो. त्याचं ना संसाराकडे लक्ष आहे, ना माझ्या शारीरिक गरजांकडे. उत्साह नसल्यामुळे दैनंदिन कामंही तो व्यवस्थित करत नाही. आपल्या इच्छेविरोत अनैसर्गिक ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा दावाही तिने केला आहे.

'तो पूर्णपणे पॉर्न अॅडिक्ट आहे. पौरुषत्वाच्या कमतरतेमुळे शारीरिक संबंधांसाठीही तो पुढाकार घेत नाही. त्याच्या अॅबनॉर्मल वागण्यामुळे माझा संसार धुळीला मिळाल आहे' असं तरुणीने याचिकेत म्हटलं आहे. पॉर्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे भारतात सेक्सविषयक गुन्हे आणि वैवाहिक वादांमध्ये वाढ झाल्याचंही ती म्हणते.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Porn ruined my marriage, Woman approaches Supreme Court over husband’s porn addiction latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV