विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

'माझं काम नैतिक की अनैतिक हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री ठरवतील ते बघू.'

Prakash Mehta exclusive interview to abp majha latest update

मुंबई : मुख्यमंत्र्यांचं नाव वापरुन खासगी बिल्डरला एफएसआय आंदण देण्याचा प्रयत्न करणारे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली आहे. फाईलवर निर्णय झालाच नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही. चौकशी करुनच त्यावरचा निर्णय घेऊ. असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मेहतांना क्लीन चिट दिली आहे. पण असं असलं तरी विरोधकांनी मात्र, त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. या सर्व प्रकरणाबाबत प्रकाश मेहतांनी एबीपी माझा एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
प्रश्न : जेव्हा खडसेंवर आरोप झाले होते. त्यावेळी चौकशी होईपर्यंत मी पदापासून दूर होणार असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. आपण राजीनामा देणार आहात का?

प्रकाश मेहता : विधानसभेत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्ष आणि मुख्यमंत्री जे काही आदेश देतील आणि पक्ष जे काही सांगेल त्या आधारावर निर्णय करु. पण काँग्रेसच्या आरोपांमुळे राजीनामा देऊ असं मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो. अनेकदा आम्ही आरोप केला. तेव्हा यांनी सगळ्यांचे राजीनामे घेतले? त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण किंवा विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

प्रश्न : तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावे फाईलवर शेरा लिहला हे तुम्हाला योग्य वाटतं का?

प्रकाश मेहता : यासंबंधी मी सभागृहात सविस्तर भूमिका मांडली आहे. ती फाईल माझ्या ऑफिसमधून गेली नाही. त्यामुळे त्यावर कोणताही आदेश झालेला नाही. त्याच्यामुळे कोणतीही गफलत झालेली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात स्पष्ट भूमिका मांडली आहे. हा नैतिकतेचा मुद्दा होऊच शकत नाही.

प्रश्न : ‘मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे.’ असा शेरा तुम्ही कसा काय लिहू शकलात? जेव्हा की त्यांना याबाबत माहित नव्हतं.

प्रकाश मेहता : जेव्हा हा विषय झालेलाच नाही तर वारंवार एका वाक्यावर प्रश्न विचारत राहणं, विधानसभा आणि विधानपरिषदेत या विषयाचा अगदी स्पष्टपणे उल्लेख झाल्याने आता वांरवार त्यावर स्पष्टीकरण देणं मला योग्य वाटत नाही.

प्रश्न : बांधकाम व्यवसायिकांना मदत करण्याचा तुमचा हेतू होता, असा आरोप धनंजय मुंडेंनी तुमच्यावर केला आहे.

प्रकाश मेहता : धनंजय मुंडे काय म्हणतात त्यावर भाजपचं सरकार चालत नाही. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक हे धनंजय मुंडेंकडून शिकण्याची गरज नाही.

प्रश्न : टीका झाली नसती तर हा निर्णय पुढे झालाच असता.

प्रकाश मेहता : तांत्रिकदृष्ट्या तो विषय आता रद्द झाला आहे. यापुढे त्याविषयी जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्यामागची भूमिका स्पष्ट होईल.

प्रश्न : तेथील जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की, आम्हाला 269 चौरस फुटांची घरं नको, असं आम्ही कधीही बांधकाम व्यवसायिकाला लिहून दिलं नव्हतं.

प्रकाश मेहता : जर रहिवाशांनी प्रस्ताव दिला तरच यावर विचार केला जाईल, असं त्या फाईलमध्ये म्हटलं आहे.

प्रश्न : पण तुम्ही म्हटलं आहे की, याप्रकरणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आहे.

प्रकाश मेहता : हे बघा तुम्ही परत-परत फिरून ते शब्द घेऊ नका. याबाबत मला जे बोलायचं होतं त्याबाबत मी सभागृहात सांगितलं आहे. जे निकषात बसत नाही ते विषय आमच्याकडून हाताळले जाणार नाहीत.

प्रश्न : म्हणजे तुम्ही तसा शेरा लिहला होता की नाही?

प्रकाश मेहता : यासंबंधी मला जे म्हणायचं होतं ते मी सभागृहात स्पष्ट केलं.

प्रश्न : याप्रकरणी राजीनामा देणार आहेत की नाही?, ती नैतिकता तुम्ही पाळणार आहात का?

प्रकाश मेहता : माझं काम नैतिक की अनैतिक हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री ठरवतील ते बघू.

प्रश्न : जोपर्यंत मुख्यमंत्री सांगणार नाहीत तोपर्यंत तुम्ही या पदावरुन दूर होणार नाहीत का?

प्रकाश मेहता : तुम्ही राजकीय प्रश्न विचारु नका, जर तात्विक प्रश्न असतील तर विचारा

प्रश्न : तिथं जे काम सुरु होतं ते अनधिकृत होतं. नेते आणि एसआरएचे सीईओ बांधकाम व्यावसायिकाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.

प्रकाश मेहता : 2009-10 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याबाबत निर्णय घेतले होते.

प्रश्न : घाटकोपरमधील एका जमिनीबद्दलही तुमच्यावर आरोप करण्यात येत आहे की, तुम्ही धर्मेंद जैन यांना म्हाडा ट्रान्झिट कॅम्पची जागा देण्याचा प्रयत्न केला.

प्रकाश मेहता : असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. लोकांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. विकासक नेमलेला नाही. त्यामुळे शासनानं कोणालाही प्लॉट देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

प्रश्न : तो प्लॉट धर्मेंद जैन यांना पुन्हा देण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप विरोधकांनी सभागृहात केला आहे.

प्रकाश मेहता : विरोधी पक्ष नेत्यांची माहिती अर्धवट किंवा खोटी आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि मग बोलावं.

प्रश्न : दिल्लीतून तुमच्यावर वरदहस्त आहे म्हणून तुमची खुर्ची वाचली आहे का?

प्रकाश मेहता : असा काहीही विषय नाही.

VIDEO : 

 

संबंधित बातम्या : 

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Prakash Mehta exclusive interview to abp majha latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर,...

मुंबई : निधीचं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार
तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार

मुंबई : मालेगाव स्फोटाप्रकरणी 9 वर्षानंतर जामीन मंजूर झालेल्या

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’
टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’

कल्याण : टीसींच्या सतर्कतेमुळे पळून जाणारं अल्पवयीन जोडपं

आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला : निरुपम
आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला...

मुंबई : मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री

लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ
लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ

मुंबई : विधी विभागासह अन्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखल

1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!
1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना विशेष टाडा

ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!

मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा

टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने मारहाण
टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने...

ठाणे : तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या नागरिक आणि

ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न
पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न

मुंबई : भारतात अद्यापही लैंगिक संबंधांबाबत उघडपणे बोललं जात नाही.