युतीच्या आमदारांचे 'लाड', पंचतारांकित 'ताज'मध्ये 'प्रसाद'

नारायण राणे यांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर उद्या पोटनिवडणूक आहे.

युतीच्या आमदारांचे 'लाड', पंचतारांकित 'ताज'मध्ये 'प्रसाद'

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेत्यांना साधेपणाची शिकवण देत असतात, तरी दुसरीकडे भाजप नेते अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजन करणार आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी आज संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकित 'ताज' हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजित केले आहे.

नारायण राणे यांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर उद्या पोटनिवडणूक आहे. त्याआधी या पोटनिवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी 'ताज' हॉटेलमध्ये स्नेहभाजन आयोजित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी भाजपच्या नेत्यांना साधेपणाची शिकवण देत असतात. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि शिस्त भाजपमध्ये असताना, निवडणुकीआधी युतीच्या आमदारांना पक्षात बाहेरुन आलेल्या प्रसाद लाड यांच्याकडून पंचतारांकित स्नेहभोजन देत असल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

प्रसाद लाड यांची राजकीय कारकीर्द

- राष्ट्रवादीत असताना अजित पवारांचे विश्वासू
- राष्ट्रवादीत असताना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काही काळ काम
- म्हाडाच्या अध्यक्षपदीही काही काळ नेमणूक
- भाजपची सत्ता आल्यावर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीविरोधात अपक्ष म्हणून लढले
- या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, तरीही पराभव
- पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश, मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक
- मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळख

प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?

  • जंगम मालमत्ता : 47 कोटी 71 लाख रुपये :


– एकूण जंगम मालमत्तांपैकी 39 कोटी 26 लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरुपात गुंतवणूक केलेली आहे.
– लाड यांची पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख
– मुलगी सायलीकडे 11 कोटी 15 लाख
– मुलगा शुभम याच्याकडे 28 लाख 28 हजार रुपये

  • स्थावर मालमत्ता : 55 कोटी 86 लाख :


– एकूण स्थावर मालमत्ता पैकी पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीत सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत.
– पत्नी निता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवासी इमारत या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.
– याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी 10 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे.

प्रसाद लाड आणि कुटुंबीयांवर नेमकं कर्ज किती?

– त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्यावर 41 कोटी 48 लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे 42 कोटी 21 लाखाचे कर्ज आहे. मुलगी सायली हिच्या नावे 1 कोटी 7 लाख तर मुलगा शुभम याच्या नावे 18 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज आहे.
– प्रसाद लाड यांनी 2016-17 या वर्षात चार कोटी 22 लाख रुपये इन्कम टॅक्स भरला आहे. तर पत्नीने 1 कोटी 84 लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Prasad Lad gives party to NDA MLA’s in Taj Hotel before MLC by poll latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV