खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन, जेलमधून सुटका

ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.

खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन, जेलमधून सुटका

ठाणे : सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल 40 दिवसांनंतर रजनी पंडित तुरुंगाबाहेर आल्या आहेत.

ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.

कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जायचे आणि विकण्यात यायचे असा आरोप आहे. ठाणे क्राईम ब्रँचने दादरमधून रजनी पंडित यांना अटक केली होती.

सीडीआर लीक प्रकरणात ठाणे पोलिसांच्या हाती आतापर्यंत अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांसह पोलिसही चौकशीच्या घेऱ्यात होते.

एबीपी माझाशी बोलताना ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले होते की, सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच,  व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, आयडिया, टाटा, जिओ आणि यूनिनॉर या 7 टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन खरेदी केले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करणार आहे, जेणेकरुन सीडीआर कंपनीकडून चोरला गेला की या कंपन्यांमधीलच कुणी व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे.

रजनी पंडित यांना लेडी जेम्स बाँड असंही संबोधलं जातं. 1991 मध्ये त्यांनी अधिकृतपणे खाजगी गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन त्या माध्यमांशी संवाद साधतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रजनी पंडित माध्यमांसमोर नक्की काय भूमिका मांडतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

संबंधित बातम्या :

ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव

सीडीआर प्रकरण : खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय

कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Private Detective Rajni Pandit got bail of rupees 20 thousands
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV