शेतकरी संपाचं नेतृत्व करा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं राज ठाकरेंना साकडं

शेतकरी संपाचं नेतृत्व करा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं राज ठाकरेंना साकडं

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं साकडं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी घातलं आहे. त्यामुळे राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतील, अशी शक्यता आहे.

ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव यांची उपस्थित होती.

राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढवला जाईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान बाळा नांदगांवकर यांनीही काही दिवसांपूर्वीच पुणतांब्यात जाऊन संपकरी शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तर राज ठाकरेंनीही शेतकरी संपावर आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्यात मनसे सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसत आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV