आधार कार्डसाठी खारघरमध्ये मध्यरात्रीपासून रांगा

नवी मुंबईतमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या आहेत. खारघर, वाशी परिसरातील सिंडिकेट बँकेसमोर आधार कार्ड काढण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे.

आधार कार्डसाठी खारघरमध्ये मध्यरात्रीपासून रांगा

नवी मुंबई : नवी मुंबईतमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्या आहेत. खारघर,  वाशी परिसरातील सिंडिकेट बँकेसमोर आधार कार्ड काढण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे. खरं तर बँक सकाळी 10 वाजता बँक उघडते. मात्र, आपलं काम लवकर होण्यासाठी लोक रांगा लावत आहेत.

धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक एका दिवसाला फक्त तीस आधार कार्ड देत आहे. त्यामुळे लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

आधार कार्डमध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सध्या बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येच आधार कार्ड मिळतं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: queue from midnight in Kharghar for Aadhar card latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV