निवृत्तीनंतर वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांना एक वर्षाची मुदतवाढ

वादग्रस्त अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षासाठी करारपद्धतीने ही नेमणूक असेल. राधेश्याम मोपलवार हे आज शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र वादात सापडलेल्या मोपलवारांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

निवृत्तीनंतर वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांना एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई : वादग्रस्त अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षासाठी करारपद्धतीने ही नेमणूक असेल. राधेश्याम मोपलवार हे आज शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र वादात सापडलेल्या मोपलवारांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांची एक कथित सीडी उघड झाली होती. ज्यात मोपलवार एका इमारतीच्या बांधकामावरुन सेटलमेंट करत असल्याचं दिसत होतं. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आली होतं.

चौकशीनंतर मोपलवार यांना सरकारने क्लीन चिटही दिली आणि मोपलवार 26 डिसेंबर 2017 ला पुन्हा सेवेत रुजूही झाले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची कामं अंतिम टप्प्यात असल्याने ती पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख शासनाच्या नियुक्ती पत्रात करण्यात आला आहे .

काय आहे नेमकं प्रकरण?

सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प एका नव्या वादात सापडला होता. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले होते.

ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा होता.

शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.

मोपलवारांची कारकीर्द

वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली.

मोपलवारांचं स्पष्टीकरण

”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं होतं.

संबंधित बातम्या

कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपनंतरही मोपलवार पुन्हा सेवेत रुजू

एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?

‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’

राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर 

मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात

मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: radheshyam mopalwar appointed again on same post after retiredment latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV