पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.

पंतप्रधान मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना राज्यातील महागाईसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. यात त्यांनी 2014 आणि 2017 मधील अकडेवारी एका ग्राफिक्सच्या माध्यमातून दिली होती.

या चार्टमधून राहुल गांधींनी भाजप सरकारच्या काळाता महागाई कशी वाढली ते सांगितलं होतं?

chart

पण त्यांनी जी आकडेवारी दिली होती, ती चुकीची होती. आपली चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधींनी चूक सुधारत, जुनं ट्वीट डिलीट केलं आणि नवीन ट्वीट त्यांनी केलं.या नव्या ट्वीटमध्ये महागाईची टक्केवारी न देता, त्यांनी वस्तूंच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली ते एका चार्टच्या माध्यमातून दाखवलं.

दरम्यान, गुजरात निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, मोदींवर वार करताना राहुल गांधींच गणित चुकल्याची चर्चा आता रंगत आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rahul gandhi wrong tweet going viral to criticizing modi government
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV