हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर, गर्दी कायम

सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.

हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर, गर्दी कायम

मुंबई : तब्बल सहा तासांनंतर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली. पावणे पाचच्या सुमारास वाहतूक सुरु झाली. आंदोलकांनी ट्रॅक अडवल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत लागला.

  • हार्बर मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, तब्बल सहा तासांनी सीएसएमटी ते पनवेल लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरु, हार्बरसह ट्रान्सहार्बरवर मार्गावरही वाहतूक धीम्या गतीने


 

LIVE - पनवेल-सीएसएमटी लोकल सेवा मागील सहा तासानंतरही ठप्प 

LIVE - वाशी-पनवेल आणि वाशी-ठाणे रेल्वे सेवा सुरु

LIVE - कुर्ला - वाशी रेल्वे सेवा अजूनही विस्कळीतच, या मार्गावरील रेल्वे वाहतूक अद्यापही बंद 

LIVE - सायन-पनवेल महामार्ग, एलबीएस मार्ग या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा

LIVE - पूर्व द्रुतगती मार्गावर कुर्ला ते विक्रोळीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी

LIVE - मुंबई उपनगरात मोठी वाहतूक कोंडी

LIVE - सीएसएमटी-कुर्ला, वाशी-पनवेल रेल्वे वाहतूक सुरु

LIVE - ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि एलबीएस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी 

LIVE - कुर्ला आणि मानखुर्द स्थानकादरम्यान वाहतूक ठप्प 

LIVE - हार्बर मार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प

LIVE -  मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक सुरु

LIVE - ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला आणि मानखुर्द/वाशी ते पनवेल या मार्गावर लोकल सुरु आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्द दरम्यान रेल्वे वाहतूक बंद आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु आहे.वाशी ते कुर्ला स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.  यामुळे हार्बर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच प्रवाशांना मानखुर्द स्थानकावरच उतरण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात येत आहे.

हार्बरवरील वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी बस आणि इतर वाहनांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं अनेक रस्ते ट्रॅफिकनं जाम झाले आहेत.

दरम्यान हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली असली तरी ट्रान्स हार्बरवर कोणताही परिणाम झालेला नाही. ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.

फवा पसरणाऱ्यांवर कारवाई : मुख्यमंत्री

आजही अफवांचं पेव फुटतंय. मात्र खोट्या गोष्टी पसरवू नये, असं आवाहन करतो. राज्यातील जनतेने संयम बाळगावा. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल," अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

तसंच तेढ निर्माण करणारी विधानं कोणीही करु नये आणि कोणत्याही पक्ष नेतृत्त्वाने संयम बाळगला पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rail disruption on Harbor road appeal to not believe in rumors latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV