वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

मुंबईत दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

मुंबई : मुंबईत आज दाट धुक्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरु असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वासिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. जवळपास दीड तास हा रेल रोको सुरु होता.

आज पहाटेपासून सगळ्या मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. काही भागात धुकं इतकं दाट आहे की, काही अंतरावरचंही दिसत नाही.त्यामुळं दिवस उजाडूनसुद्धा रस्त्यांवर वाहनांना हेडलाईट लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही आहे.

या धुक्याचा परिणाम रस्ते आणि लोकल वाहतुकीवर होत आहे. दाट धुक्यामुळे सर्वच लोकल अतिशय धिम्या गतीने चालत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे वरील वासिंद रेल्वे स्थानकातील संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

संतप्त प्रवाशांचा तब्बल दीड तास हा रेल रेको सुरु होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rail roko in vasind railway station latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV