मुंबई दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची प्रकृती बिघडली

विविध रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पियुष गोयल यांनी स्वतः लोकलने प्रवास केला.

मुंबई दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची प्रकृती बिघडली

मुंबई : रेल्वे मंत्री आणि भाजपचे नेते पियुष गोयल यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.

रेल्वेमंत्री पियुष गोयल काल (27 नोव्हेंबर) मुंबईच्या दौऱ्यावर होते. विविध रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पियुष गोयल यांनी स्वतः लोकलने प्रवास केला. मात्र संध्याकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गोयल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पियुष गोयल सीएसएमटी स्टेशनवर संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधणार होते. पण प्रचंड पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोयल यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याचं त्यांच्या दिल्लीतील कार्यलयाने सांगितलं आहे.

त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार नाही, परंतु त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असं पीयुष गोयल यांच्या कार्यालयाने सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Railway minister Piyush Goyal hospitalised after complains of stomach pain, stable
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV