‘कमल’ हसनवरुन भाजपवर निशाणा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हसन यांनी घेतलेल्या प्रवेशावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाष्य केले आहे.

‘कमल’ हसनवरुन भाजपवर निशाणा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हसन यांनी घेतलेल्या प्रवेशावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाष्य केले आहे.

व्यंगचित्रात काय आहे?

‘तामिळनाडू’ नावाच्या तलावात दोन कमळ दाखवण्यात आले आहेत. एक कमळ आकाराने मोठं, तर दुसरं लहान आहे. मोठ्या कमळावर अभिनेते कमल हसन उभे असून, कमळाच्या पाकळ्यांवर लिहिले आहे ‘तामिळ अस्मिता’. तर त्याच तलावात दुसऱ्या लहान कमळाच्या बाजूला ‘भाजप’ लिहिले आहे.

Raj Thackeray Cartoon

तलावाच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह उभे असून, अमित शाह हे मोदींना उद्देशून बोलत आहेत, “साहेब, हे अचानक कुठून उगवलं आता?”

राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून अनेकदा अमित शाह, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. आता त्यांनी आपला मोर्चा तामिळनाडूकडे वळवला आहे. तामिळनाडूतल्या अस्मितेचा आधार घेत राज यांनी मोदी-शाह यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raj Thackeray target BJP over Kamal Hasaan’s political entry
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV