राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा

सत्तेतून बाहेर पडण्याचे जे इशारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून कायम दिले जातात, तो धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलं आहे.

राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर नवं व्यंगचित्र पोस्ट केले आहे. विशेष म्हणजे हे व्यंगचित्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणारं आहे. पहिल्यांदाच त्यांनी फेसबुक पेजवरुन उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांसह सर्वच सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरेंनी फेसबुक पेजवरुन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे.

सत्तेतून बाहेर पडण्याचे जे इशारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून कायम दिले जातात, तो धागा पकडत राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलं आहे.

Raj Thackeray सौजन्य - राज ठाकरे यांचं फेसबुक पेज

‘परत सांगतो सोडून जाईन’ असे नाव या व्यंगचित्राला देऊन, भाजप नावाची एक व्यक्ती दाखवण्यात आली असून, उद्धव ठाकरे तिच्या गळ्याला टांगताना दिसत आहेत. ‘सोडू?’ असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, तर भाजप नावाची व्यक्ती ‘अहो, पण आम्ही कुठे धरलंय तुम्हाला?’ असे म्हणत आहे. त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची स्थिती राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मांडली आहे आणि त्यावर भाष्य केले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raj Thackeray’s cartoon on Uddhav Thackeray
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV