फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.' असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे

डोंबिवली : ‘फेरीवाल्यांकडून प्रशासनाला तब्बल 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो.’ असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हा धक्कादायक आरोप केला.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचा सत्ताधाऱ्यांवरुन विश्वास उडला आहे. तसेच खोट्या ‘अच्छे दिन’चा फुगाही लवकरच फुटेल. असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता’

‘मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण पुन्हा एकदा फेरीवाले बसण्यास सुरुवात झाली. फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘पैसे नसतानाही सरकारकडून योजनांच्या घोषणा’

पैसे नसतानाही भाजप सरकार योजना जाहीर करण्याची लगीनघाई करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच कर्जमाफी, जीएसटी अशा अनेक मुद्यांवरुन राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

‘...तर गुजरातमध्ये भाजपच्या विजयात ईव्हीएमचा मोठा वाटा असेल’

‘दरम्यान, गुजरात निवडणुकीबाबतही राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.  ‘गुजरातमध्ये भाजपने जर 150 हून अधिक जागा मिळवल्या तर त्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल.’ असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

LIVE : फेरीवाल्यांबाबतीत मनसेला जमलं, ते प्रशासनाला जमत नाही का? : राज ठाकरे

LIVE : शेतकरी कर्जमाफी मूर्ख बनवण्याचं काम : राज ठाकरे

LIVE : फेरीवाले परत का बसले? हे प्रशासनाला विचारा : राज ठाकरे

LIVE : सर्व सुरळीत सुरु असताना जीएसटीचा घाट कशाला? : राज ठाकरे

LIVE : फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता : राज ठाकरे

LIVE : मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला : राज ठाकरे

LIVE : पैसा नसतानाही सरकार योजना जाहीर करतं : राज ठाकरे 

LIVE : भाजपवर टीका व्हायला लागल्यानं मुस्कटदाबी सुरु : राज ठाकरे

LIVE : खोट्या 'अच्छे दिन'चा फुगा लवकरच फुटणार : राज ठाकरे

LIVE : गुजरातमध्ये भाजपने 150 हून अधिक जागा मिळवल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल : राज ठाकरे

LIVE : लोकांचा सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास उडला आहे : राज ठाकरे

LIVE : बेहरामपाड्यात बांग्लादेशी घुसखोर राहतात, तिथल्या बांधकामांवर कारवाई होत नाही : राज ठाकरे

LIVE : पाकिस्तानी आणि बांगलादेशी आपण पोसत आहोत, त्यांना पायबंद घालण्याची कुणाची हिंमत नाही : राज ठाकरे

संबंधित बातम्या :

राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर, नगरसेवकांशी चर्चा करणार

व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती


कुत्र्यांना भुंकू दे, मी हत्तीची चाल चालणार : दिलीप लांडे


शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?


सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 


मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 


शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?


करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप


मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: administration receives an amount of Rs 2,000 crore from the hawkers, Raj Thackeray’s accusation latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV