राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा सोमवारी साखरपुडा

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेची सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे.

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा सोमवारी साखरपुडा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे.

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेची सोमवारी म्हणजे 11 डिसेंबरला एंगेजमेंट होणार आहे. कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल.

मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे, तर अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होणार आहे.

विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे. या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पाहा फोटो :


अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा ठरला

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raj Thackeray’s son Amit Thackeray to get engaged with Mitali Borude latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV