संदीप येवलेंनी पुरावे द्यावेत नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकेन: राम कदम

मुंबईतल्या एसआरएस घोटाळा स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस येऊन 24 तास उलटल्यानंतरही या प्रकरणी कारवाईचे कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. पण या प्रकरणी विरोधकांनी मात्र कारवाईसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

Ram kadam reaction on sandip yevle’s attribution SRA Scam latest update

मुंबई: मुंबईतल्या एसआरएस घोटाळा स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस येऊन 24 तास उलटल्यानंतरही या प्रकरणी कारवाईचे कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. पण या प्रकरणी विरोधकांनी मात्र कारवाईसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

स्टिंग ऑपरेशननंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले हे काल (बुधवार) 40 लाखांची रोकड घेऊन थेट मीडियासमोर आले होते. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांवरही आरोप केले होते. यावेळी संदीप येवलेंनी भाजप आमदार राम कदम यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या याच आरोपाला आज (गुरुवार) राम कदम यांनी उत्तर दिलं आहे.

‘घाटकोपरच्या घरा-घरातील लोकांना माहिती आहे की, राम कदम काय आहे’

संदीप येवले यांच्या आरोपानंतर भाजप आमदार राम कदम यांनीही या आरोपाला उत्तर दिलं आहे. ‘संदीप येवले या व्यक्तीने राजकीय हेतून प्रेरित होऊन माझ्यावर आरोप केले आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. त्या भागातील 33 लोकांची घरं मी वाचवली, त्यामुळे या माणसाच्या मागे असणारी लोकं माझ्या मागे आली याचाच त्याच्या मनात राग आहहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, जसा लाच देणारा गुन्हेगार आहे. तसाच लाच घेणाराही गुन्हेगार आहे. त्यामुळे जर 24 तासाच्या आता त्यांनी पुरावे दिले नाहीतर नाईलाजानं मला 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल. घाटकोपरच्या घरा-घरातील लोकांना माहिती आहे की, राम कदम काय आहे.’ असं यावेळी राम कदम म्हणाले.

 

VIDEO:

 

विक्रोळी पार्कसाईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरनं तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला आहे. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवलेंनी सादर केलं आहे. विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावेही येवले यांनी समोर ठेवले आहेत.

दरम्यान, या सगळ्या घोटाळ्यात एसआरएचे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही येवलेंनी गंभीर आरोप केले आहेत. बिल्डरनं दिलेले सगळे पैसे घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघात दाखल झाले आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

संदीप येवलेंनी नेमके काय आरोप केले?

‘विक्रोळीतील हनुमाननगरच्या विभागात 22 वर्षापासून एसआरए योजना बंद पडली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेत आतापर्यंत कायद्याचं उल्लंघन झालं आहे. या योजनेतील भष्ट्राचार आम्ही माहिती अधिकारच्या अंतर्गत उघड केल्यानंतर बिल्डरनं मला 11 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 1 कोटीची रोख रक्कम दिली. त्यापैकी 40 लाख मी मीडियासमोर आणले आहेत.’ असा गंभीर आरोप संदीप येवलेंनी केला आहे.

‘या प्रकरणी माझ्याशी बोलणी करण्याकरिता बिल्डरच्या वतीनं कौशिक मोरे ही व्यक्ती आली होती. ‘माझं सेटिंगचंच काम आहे. बाबूलाल वर्मा हे तर सीएम आणि पीएमलाही खिशात ठेवतात.’ असं कौशिक मोरेनं मला सांगितलं होतं.’ असंही येवले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

‘बिल्डर मोठा आहे पैसे घेऊन जा. असं मला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.’ असा आरोप त्यांनी एसआरए अधिकाऱ्यांवरही केला.

‘दरम्यान, माझ्यासोबत ज्या मीटिंग झाल्या त्याचे कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी येवलेनं केली आहे.

‘याप्रकरणी माझ्यावर राजकीय दबावही’

‘माननीय आमदार राम कदम यांना मी दीड वर्षापूर्वी याबाबत निवेदन दिलं होतं. तेव्हा राम कदम मला म्हणाले की, ‘हे लोकं काही तुझ्याकडे बघणार नाही, मी तुला बिझनेस काढून देतो.’  त्यानंतर मी किरीट सोमय्या, आणि प्रकाश मेहतांकडे गेलो. पण बिल्डर लॉबीसमोर यांचं काहीच चालत नाही. किरीट सोमय्यांनी तर आम्हाला अक्षरश: हाकलून लावलं.

यावेळी येवलेंनी आमदार राम कदमांना आव्हानही दिलं. ‘राम कदम यांना आम्ही चॅलेंज देतो, की पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मंदिरात बसवू आणि आम्ही दुसरा आमदार निवडून आणू.’

 

संंबंधित बातम्या:

 

बिल्डरकडून कोट्यवधीची लाच, रोख रकमेसह सामाजिक कार्यकता मीडियासमोर

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ram kadam reaction on sandip yevle’s attribution SRA Scam latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

धबधब्यात बाहुबली स्टाईल उडी मारण्याच्या नादात जीव गेला
धबधब्यात बाहुबली स्टाईल उडी मारण्याच्या नादात जीव गेला

कल्याण: बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली, तशी उडी

बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू सुरु करण्यात

सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळा, हायकोर्टात याचिका
सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळा, हायकोर्टात याचिका

मुंबई: सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळण्यात यावं, अशी मागणी करत मुंबई

ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ई-पोर्टल
ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ई-पोर्टल

मुंबई: ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच एक ई-पोर्टल

कर्जमाफी 34 हजार कोटींची, जाहिरातबाजी 36 लाखांची!
कर्जमाफी 34 हजार कोटींची, जाहिरातबाजी 36 लाखांची!

मुंबई : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांच्या

पारसिक बोगद्याजवळील कामाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
पारसिक बोगद्याजवळील कामाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई: मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा देत

भाऊचा धक्का पुन्हा एकदा....
भाऊचा धक्का पुन्हा एकदा....

मुंबई : मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, ह्या गाण्यातून आरजे

मलिष्काकडून माध्यमांचे आभार, ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट
मलिष्काकडून माध्यमांचे आभार, ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट

मुंबई : ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ असं म्हणत मुंबई

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर
अकरावी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी वेळेआधीच जाहीर

उद्यानाची जमीन बिल्डरला देणाऱ्या म्हाडाला 2 लाखांचा दंड
उद्यानाची जमीन बिल्डरला देणाऱ्या म्हाडाला 2 लाखांचा दंड

मुंबई : उद्यानाकरता राखीव भूखंड विकासकांना आंदण देणाऱ्या म्हाडाला