अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार

बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली आणि बुलेटची चावी मागितली. तरुणाने विरोध केल्याने, आरोपीने त्याची हत्या केली आणि सोबतच्या तरुणीवर बलात्कार केला.

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार

कल्याण : तरुणाची हत्या करत तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8 च्या सुमारास गणेश नावाचा तरुण तरुणीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका आरोपीने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या तरुणीच्या छातीवर बंदूक ठेवत त्याला भीती दाखवली आणि बलात्कार केला. तरुणाने विरोध करताच बंदूकधारी लुटारुने त्या तरुणावर गोळीबार केला. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी या रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने हवेशीर ठिकाणी अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या भागात येत असतात. मात्र याच रस्त्याच्या पुढच्या भागात अनेक जोडपे एकांत शोधत दुचाकीवर बसून गप्पा मारत असतात. अशाच प्रकारे शहापूर अस्नोली गावात राहणारा तरुण गणेश दिनकर हा आपल्या तरुणीसोबत अंबरनाथच्या नालंबी येथील रस्त्याच्या बाजूला बसला होता.

गणेश हा शहापूरचा रहिवासी असला तरी आपल्या नातेवाईकाच्या चायनिजच्या दुकानात काम पाहत होता. त्यामुळे त्याचं वास्तव्य अंबरनाथचंच होतं. गणेश हा आपल्या नातेवाईकाची बुलेट गाडी घरातून काढून बाहेर पडला. तरुणीला सोबत घेऊन तो त्या डोंगरावर बसलेला असताना एक तरुण मागून आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली आणि बुलेटची चावी मागितली. तरुणाने विरोध केल्याने, आरोपीने त्याची हत्या केली आणि सोबतच्या तरुणीवर बलात्कार केला.

त्याला विरोध करण्यासाठी गणेश पुढे सरसावताच त्या लुटारुने त्याच्यावर गोळीबार करुन त्याला जखमी केलं. त्यानंतर त्या तरुणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करुन पळून गेला, असा पीडित मुलीने म्हटलं आहे. आरोपी पळून गेल्यावर त्या तरुणीने येणा-जाणाऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असली तरी अंबरनाथ पोलीसांनी प्राथमिक तपास करुन गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rape on girl and her boyfriend killed in Ambernath
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV