झोपेच्या गोळ्या देऊन बलात्कार, वडिलांच्या मित्राचं कुकर्म

मार्च ते डिसेंबर असे दहा महिने तरुणीवर वासनांधाने जबरदस्तीने बलात्कार केला आहे. यात तरुणी गरोदर राहिल्याच्या नंतर हा प्रकार उघड झाला आहे.

झोपेच्या गोळ्या देऊन बलात्कार, वडिलांच्या मित्राचं कुकर्म

नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यातील एका अठरा वर्षीय मुलीवर वडिलांच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना घडली. डोकेदुखीवर गोळी देण्याच्या बहाण्याने झोपेच्या गोळ्या देऊन नराधम बलात्कार करत होता. यात पीडित तरुणी गरोदर राहून तिने एका मुलाला जन्मही दिला आहे. याबाबत वालिव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन वासनांध आरोपीला वालिव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या ताब्यात असणारा हाच वासनांध पंचेचाळीस वर्षीय आरोपी आहे. संजीवन हरिहर चौधरी असे त्याचे नाव असून, तो भाजी विक्रिचा व्यवसाय करतो. पीडित तरुणीच्या वडिलांचा हा मित्र ही आहे. त्यामुळे पीडितेच्या घरी अधून मधून त्याचे जाणे येणे होते.

पीडित तरुणीला डोकेदुखीचा त्रास होता. तिला अनेकवेळा दवाखाण्यात ही दाखविण्यात आले. पण तिचे डोके दुखायचे थांबत नव्हते आणि ही गोष्ट आरोपीला माहित होती. याच संधीचा फायदा घेवून, मार्च 2017 या महिन्यात त्याने तिच्या रहात्या घरी पहिल्यांदा तुझे डोके दुखत आहे. ही गोळी खा डोके राहिल असे सांगून तिला गोळी दिली. ती झोपेची गोळी असल्याने पीडितेला झोप आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

पीडित तरुणीला जेव्हा जाग आली, तेव्हा सदर प्रकार तिच्या लक्षात आला होता. पण ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारेन, अशा धमक्याही तिला देण्यात आल्याचे पीडितीने तक्रारीत म्हटले आहे.

मार्च ते डिसेंबर असे दहा महिने तरुणीवर वासनांधाने जबरदस्तीने बलात्कार केला आहे. यात तरुणी गरोदर राहिल्याच्या नंतर हा प्रकार उघड झाला आहे. तरुणीने एका मुलालाही जन्म ही दिला आहे. याबाबत वालिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केलं आहे.

वासनांधाची नजर कधी आणि कुणावर पडेल, हे मात्र सांगता येत नाही. नेमके हेच वसईतील बलात्काराच्या घटनेत समोर आले आहे. वडिलांच्या मित्रानेच चक्क 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिला गरोदर केली असल्याच्या घटनेने मात्र परिसरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे मुलींनी आता विश्वास कुणावर ठेवावा असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rape on Girl in Nalasopara latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV