प्रशासनात मोठे फेरबदल, सुधाकर शिंदेंसह 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली

यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रशासनात मोठे फेरबदल, सुधाकर शिंदेंसह 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : राज्यातील 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

सुधाकर शिंदे यांच्याविरोधात पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव राज्य सरकारने निलंबितही केला होता. मात्र अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.

सध्याचं ठिकाण आणि नवी नियुक्ती

रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली

वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी – अहमदनगर जिल्हाधिकारी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या आचल गोयल – रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने – परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा अतिरिक्त पदभार

औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम – पुणे जिल्हाधिकारी

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण – औरंगाबाद जिल्हाधिकारी

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सौरव राव – पुणे महापालिका आयुक्त

महिला आणि बालकल्याण आयुक्त डॉ. एस. एल. माळी – नांदेड महापालिका आयुक्त

अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर माधवी खोडे-चावरे- महिला आणि बालकल्याण आयुक्त

अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती – महाव्यवस्थापक, खाण महामंडळ नागपूर

एमएमआरडीएचे डॉ. संजय यादव- अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

बुलडाण्याचे जिल्हाधिकारी सीएल पुलकुंडवार – सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी

खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक निरुपमा डांगे - बुलडाणा जिल्हाधिकारी

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना

गणेश देशमुख – पनवेल महापालिका आयुक्त

पुण्याचे शिक्षण आयुक्त डॉ. बिपिन शर्मा – संचालकीय व्यवस्थापक, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे

पाणी पुरवठा विभागाचे रुचेश जयवंशी – दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे

दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे एन. के. पाटील – प्रशिक्षण

अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. ए. एम. महाजन – पाणी पुरवठा विभाग

जालन्याचे जिल्हाधिकारी एस. आर. जोंधळे – मुंबई शहर जिल्हाधिकारी

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. जी अर्दाड – अहमदनगर महानगरपालिका आयुक्त

अहमदनगर महानगरपालिका आयुक्त जी. सी. मांगले – महानंदचे व्यवस्थापकीय संचालक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या पवनीत कौर – औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

एच. मोडक – अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: reshuffle in administration 25 IAS officers has been transferred
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV