लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा मोठा प्रतिसाद

लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलावला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या लिलावात सोन्याच्या बिस्कीटांना सर्वाधिक 31 लाख 18 हजाराची किंमत मिळाली.

लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा मोठा प्रतिसाद

मुंबई : लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलावला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण 82 लहान-मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सोन्याच्या बिस्कीटांना सर्वाधिक 31 लाख 18 हजाराची किंमत मिळाली.

लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे. सोन्याच्या बिस्कीटाला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 18 हजारांची किंमत मिळाली, तर सोन्याच्या गणेशमूर्तीला 14 लाख 50 हजार रुपये एवढी किमत  मिळाली.

तसेच चांदी मिश्रीत तांब्याच्या तलवारीला 60 हजार रुपयाची किंमत मिळाली. राहुल  उपध्याय यांनी ही तलावर खरेदी केली. तर नितीन  देवडा या गणेश भक्ताने नऊ हजाराच्या बोलीने गणेशमूर्ती खरेदी केली. देवडा गेल्या 11 वर्षांपासून दरवर्षी लालबागच्या राजाच्या दरबारातील लिलावात सहभागी होऊन, कोणतीतरी  वस्तू  खरेदी  करतात. यंदा त्यांनी प्रसाद म्हणून  पहिल्यांदाच गणेशमूर्ती खरेदी केली.

दरम्यान, लालबागच्या राजाला भक्तांनी फसवल्याचं उघड झालं आहे. कारण नोटाबंदीनंतर चलनातून रद्द झालेल्या नोटांचं दान लालबागच्या राजाला  देण्यात आलंय.

लालबागच्या राजा गणपतीच्या दानपेटीत, रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा सापडल्या आहेत.या नोटांचं मूल्य तब्बल 1 लाख 10 हजार रुपये आहे.

संबंधित बातम्या

रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवलं, दान पेटीत हजाराच्या जुन्या नोटा!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV